vasaiX हा वसईच्या ख्रिस्ती समाजाला जोडण्यासाठी, माहिती देण्यासाठी आणि समाजाच्या सेवेसाठी सुरू केलेला एक छोटासा डिजिटल उपक्रम आहे.

या प्रवासाची सुरुवात दुःखद निधन, स्मरणदिन आणि मासची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यापासून झाली आहे—आपल्या प्रियजनांचे स्मरण प्रार्थना, आदर आणि सन्मानाने करता यावे, या भावनेतून.

आज एखाद्या दुःखद निधनाची किंवा स्मरणाची माहिती अनेक WhatsApp ग्रुप्समध्ये आणि व्यक्ती-व्यक्तींना वेगवेगळी पाठवावी लागते. vasaiX मुळे ही गरज कमी होईल. एकदा माहिती वेबसाइटवर प्रकाशित केली की, ती एकाच ठिकाणी, कधीही आणि जगाच्या कोणत्याही भागातून सहज उपलब्ध राहील. त्यामुळे आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि समाजातील व्यक्तींना ती माहिती पुन्हा पुन्हा पाठवण्याची आवश्यकता राहणार नाही.

ही सेवा सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. कोणतेही सेवा शुल्क न आकारता, आपल्या समाजाच्या सेवेसाठी आणि आपल्या प्रियजनांच्या स्मृती जपण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे.

vasaiX वर काय पाहता येईल?

🏠 होम — येथे सर्व नवीन प्रकाशित निधन व स्मरणविषयक पोस्ट एकाच ठिकाणी पाहता येतात.
🗂️ संग्रह — निधनाच्या सर्व नोंदी वर्ष आणि महिन्यानुसार पाहता येतात.
🕊️ स्मरणदिवस — आजच्या तारखेशी संबंधित जन्म व मृत्यू स्मरणदिवस जाणून घेता येतात.
⛪ आगामी मिस्सा — येणाऱ्या सातव्याची मिस्सा, महिन्याची मिस्सा, आणि उपलब्ध असल्यास सहा महिन्यांची मिस्सा आणि वर्षाची मिस्सा यांची माहिती येथे प्रकाशित असते. ही माहिती मिस्साच्या सहा (6) दिवस अगोदरपासून ते मिस्साच्या दिवसापर्यंत प्रदर्शित होते.
📅 हा महिना — चालू महिन्यातील जन्म व मृत्यू स्मरणदिवस तसेच सातव्याची, महिन्याची, सहा महिन्यांची आणि वर्षाची मिस्सा यांची माहिती तारखेनुसार पाहता येते.
🔍 शोधा — नाव किंवा नावाचा काही भाग टाकून संबंधित नोंद सहज शोधता येते.

वसईत जन्मलेले. आपल्या समाजासाठी घडलेले. आपल्या सर्वांसोबत पुढे वाटचाल करणारे.

vasaiX is a small digital initiative started to connect the Christian community of Vasai, share information, and serve the community.

This journey began with the aim of making obituary notices, remembrance days, and Mass information available in one place, inspired by the desire to remember our loved ones with prayer, respect, and dignity.

Today, information about a sad demise or remembrance often has to be shared separately across multiple WhatsApp groups and sent individually to different people. vasaiX will help reduce this effort. Once information is published on the website, it will remain available in one place, at any time and from anywhere in the world. This eliminates the need to repeatedly forward the same information to relatives, friends, and members of the community.

This service is completely free for everyone. Without charging any service fees, this is a small effort to serve our community and preserve the memories of our loved ones.

What can you find on vasaiX?

🏠 Home — All newly published obituary and remembrance posts can be viewed in one place.
🗂️ Archives — All obituary records can be viewed year-wise and month-wise.
🕊️ Remembrance Days — Find out about birth and death anniversaries associated with the current date.
⛪ Upcoming Masses — Information about upcoming Seven-Day Mass, Month Mass and, where available, Six-Month Mass and Yearly Mass is published here. This information is displayed from six (6) days before the Mass until the day of the Mass.
📅 This Month — View birth and death anniversaries, along with information about Seven-Day Mass, Month Mass, Six-Month Mass and Yearly Mass, arranged by date for the current month.
🔍 Search — Easily find the relevant record by entering a name or any part of a name.

Born in Vasai. Shaped by our community. Moving forward together with all of you.